डबल मर्डर करून पळून जाणाऱ्या आरोपींना वांबोरी रोडवर सहा आरोपींना अटक

0
38

डबल मर्डर करून पळून जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

वांबोरी रोडवर सापळा लाऊन सहा आरोपींना अटक केली.

अहमदनगर – यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात किरकोळ कारणावरून राहुल केवटे व क्रीश केवटे या दोघांची हत्या करून अहमदनगर मार्गे पुणे येथे पळून जात असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांबोरी फाटा येथे सापळा लावून ६ आरोपींना अटक केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील विटाळवाडी येथे दोन जणांची हत्या व एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून एका मालवाहतूक टेम्पो मधुन आरोपी पुण्याकडे पळून जात असल्याची माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानूसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्रीच्या वेळी वांबोरी फाटा येथे सापळा लावला होता. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू केली असता एका मालवाहतूक टेम्पो मध्ये आरोपी पवन वाळके, निलेश थोरात, गोपाल कापसे, गणेश तोरकड, गणेश कापसे आणी अवि चव्हाण या सहा आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून यामध्ये पवन वाळके याच्यावर जबरी चोरी, खून व खुनाच्या गुन्ह्यांचे तब्बल ७ गुन्हे दाखल आहे तर निलेश थोरात याच्यावर ३ व गोपाल कापसे याच्यावर ५ गुन्हे दाखल आहे.