आणखी एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण,नगर तालुक्यातील घटना…

0
1102

नगर तालुक्यातील निंबोडी गावच्या शिवारातून एका १४ वर्षीय शाळकरी मुलीला ङ्गूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या आईने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली शाळकरी मुलगी ही धुतलेला शाळेचा ड्रेस नवीन बांधलेल्या घरात वाळायला टाकण्यासाठी गेली. त्यानंतर ती पुन्हा घरी परतलीच नाही. तिचा गावच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेले असल्याची शक्यता तिच्या कुटूंबियांनी व्यक्त केली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरूध्द भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.