पतीनेच केले पत्नीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल… सायबर क्राईम गुन्हा दाखल

0
1156

पत्नीचे अश्लिल व्हिडिओ काढून ते नातेवाईकांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी पती विरोधात सायबर पोलीस ठाण्यात 23 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित पत्नीने पतीविरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मुळच्या नाशिक जिल्ह्यातील फिर्यादी यांचा विवाह पारनेर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत झाला आहे. फिर्यादीचे पतीने 14 जुलै, 2022 रोजी सकाळी त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅपवरून फिर्यादीचे मामा, मावस भाऊ व दाजी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर फिर्यादीचे अश्लिल व्हिडीओ व इतर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाठविले. यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन बदनामी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे