निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर दक्षिणेमध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये ही जनसंवाद यात्रा होत असून आज याचे नियोजन तिसगाव या ठिकाणी होते. मात्र, सभेचे नियोजन न झाल्यामुळे लंके यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती नाराजी व्यक्त करत ते शिरापूरकडे रवाने झाले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, लंके यांनी स्थानिक नागरिकांचे संवाद साधत त्या ठिकाणावरून रवाना झाल्याचे व्हिडिओ देखील आता प्रसारित होत आहेत. लंके यांच्या जनसंवाद यात्रेवर टीका-टिप्पणी करताना भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले, ही जनसंवाद यात्रा नसून ही फसवणूक यात्रा आहे. निलेश लंके यांनी हा फुगा फुगवलेला असून हा लवकरच फुटणार आहे. दिलीप भालसिंग म्हणाले, ही जनसंवाद यात्रा नसून ही फसवणूक यात्रा आहे. निलेश लंके यांनी हा फुगा फुगवलेला असून हा लवकरच फुटणार आहे. लोक लंके यांच्या जनसंवाद यात्रेला प्रतिसाद देणार नाही कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेवून पुन्हा एकदा ते सुजय विखे यांनाच निवडून देतील, असा विश्वास देखील भालसिंग यांनी व्यक्त केला. गेली पाच वर्षे ते देखील सत्तेत होते. मात्र, त्यांनी कुठले विकास कामे केले हे त्यांनी देखील दाखवून द्यावे. पक्ष बदलू, दल बदलू म्हणत भालसिंग यांनी थेट लंकेंवरतीच निशाणा साधला आहे.