श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुधीर वसंतराव लहारे यांची तर उपाध्यक्ष पदी विजय भानुदास दंडवते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता नूतन संचालक मंडळाची बैठक प्रांतधिकारी तथा पिठासीन अधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीत लहारे व दंडवते यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. या प्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. नूतन पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झालेले सुधीर लहारे हे वाकडी येथील तर उपाध्यक्ष पदी निवड झालेले दंडवते हे साकुरी येथील असून ते दिवंगत भानुदास दंडवते यांचे चिरंजीव आहेत.