पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांचा जामीन मंजुर

0
29

अहमदनगर – अहमदनगर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांचा जामीन मंजुर झाला आहें. 2021 मध्ये 376 गुन्ह्याखाली मोकाटे यांना अटक करण्यात आली होती. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी अत्याचारासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दोषआरोप पत्र दाखल करण्यात आलें होते.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील मोकाटे यांचे जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळले होते. तर सदर प्रकरणा मध्ये मार्च 2023 मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. यावेळी ॲडव्होकेट सतीष गुगळे हें आरोपीचे काम पाहत असतांना त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज सादर केला होता.

त्यावर अखेरकार सुनावणी होऊन न्यायालयाने आपला निकाल दीला
यामध्ये न्यायालयाने गोविंद अण्णा मोकाटे यांची जामीन मंजुर केली असून मोकाटे यांच्यावतीने ॲडव्होकेट सतीष गुगळे यांनी काम पाहीले