ग्रामसेवकांची नगर ते पंढरपूर पायी प्रबोधन दिंडी १७ जून रोजी रवाना होणार : एकनाथ ढाकणे
नगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अहमदनगर शाखेच्यावतीने यंदाही नगर ते पंढरपूर ग्रामसेवक प्रबोधन पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे हे सहावे वर्षे आहे. दि.१७ जून रोजी ही दिंडी मार्गस्थ होईल तर दि.२१ जुलै रोजी पंढरपुरात विठु माउलीच्या दर्शनाने सांगता होईल, अशी माहिती युनियनचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.
दिनांक १७ जून ते २१ जून 2023 यादरम्यान पायी दिंडी सोहळा अहमदनगर ते करमाळा आणि जेऊर मार्गे पंढरपूर दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता सकाळी ग्रामसेवक पतसंस्था टिळक रोड राज पॅलेसच्या मागे अहमदनगर या ठिकाणाहून आपल्या यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत विठू माऊली रथ पूजा होऊन दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे गेली सहा वर्ष ग्रामसेवक सेवेकरी वारकरी अध्यात्मिक सेवा करत विविध विकास योजनांचा प्रबोधन करत मार्गक्रमण करत आहे.अतिशय शिस्तबद्ध उत्स्फूर्तपणे सहभाग आणि शासकीय कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रात एकमेव दिंडी असणारा हा सोहळा आहे.
ग्रामसेवकांना आपले काम करताना अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी वारीच्या परंपरेत प्रत्येकाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे. याची अनुभूती मागील या दिंडीत सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना आली. ग्रामसेवकांची ही दिंडी आयोजित करताना समाज प्रबोधनही करण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, सेवा हमी कायदा, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, स्वच्छता अभियान, नरेगा योजना, शौचालय वापर, निर्मल ग्राम, अंधश्रध्दा निर्मूलन, व्याख्याने, भारूडाच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. पायी दिंडीदरम्यान थेट पंढरपूरपर्यंतच्या वाटेवर ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे काम ग्रामसेवक करणार आहेत. पंढरपूरला पोहचल्यावर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम करण्याचे साकडे पांडुरंगाच्या चरणी घालण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.