जिल्हा परिषद कर्मचारी पाल्य व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषदेत २६ ऑगस्ट रोजी कार्यशाळा
आय.ए.एस. अधिकारी विनायक नरवडे करणार मार्गदर्शन
नगर: जिल्हा परिषद कर्मचार्यांची पाल्ये तसेच अहमदनगर जिल्हयातील महाराष्ट्र
लोकसेवा आयोग (एमपीएसी) व केंद्रिय लोकसेवा आयोगाचे ( युपीएससी) परिक्षेसाठी प्रयत्न करणा-या उमेदवारांना मार्गदर्शन करणेसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आय ए एस अधिकारी विनायक नरवडे  ( एअर ३७ युपीएससी, सीएसई २०२०)  हे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय व त्यात यश मिळण्यासाठी अभ्यास कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या विशेष पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यशाळेतून प्रत्येकाला नवा आत्मविश्वास प्राप्त होईल व स्पर्धा परीक्षेचे तंत्र मंत्र अवगत होईल. तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.






