जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी संतोष भैलुमे, योगेश पंडुरे यांची निवड

0
117

अहमदनगर -अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञ (स्वीकृत ) संचालकपदी संतोष कांतीलाल भैलुमे (श्रीगोंदा) व योगेश रमेश पंडुरे (नेवासा) यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेची संचालक मंडळची मासिक सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात चेअरमन संजय कडूस यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. सदर सभेत संस्थेच्या तज्ञ (स्वीकृत) संचालक पदी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण ता. श्रीगोंदा येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले संतोष कांतीलाल भैलुमे व नेवासा पंचायत समितीतील शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले योगेश रमेश पंडुरे यांची निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय कडूस, व्हा चेअरमन भाऊसाहेब चांदणे यांच्यासह सर्व संचालक व सभासदांच्या उपस्थितीत स्वीकृत संचालकाचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना स्वीकृत संचालक संतोष भैलुमे व योगेश पंडुरे यांनी संचालक मंडळाने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानत संस्थेच्या हितासाठी आपण सदैव कटिबध्द राहू असे सांगितले.
यावेळी संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, इंजि. राजू दिघे, डॉ. दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, श्रीमती सुरेखा महारनूर, श्रीमती मनीषा साळवे, व्यवस्थापक राजेद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे व संस्थेचे सभासद देवराम साळवे, रविंद्र पाबळकर, सुनील काकडे, रामा वरे, डॉ. नितिन निर्मळ, मनोहर गायकवाड, सतिश काजळे उपस्थित होते.