पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांचा सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार

0
23

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांचा सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार
अहमदनगर – जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांचा सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा पशुचिकित्सा व्यवसाय संघटना अहमदनगर च्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, डॉ. मुकुंद राजळे, डॉ.रामदास गाडे, डॉ. प्रज्ञा ओहळ, डॉ. अशोक ठवाळ , डॉ. वृषाली भिसे, डॉ. चंद्रशेखर सोनावळे, डॉ नितीन निर्मळ, डॉ. गंगाधर निमसे, डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे, डॉ. सुधाकर लांडे, डॉ. दिनेश क्षिरसागर, डॉ. संतोष साळुंके, डॉ. दिलीप डांगे, डॉ. सुरेश घुले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ मोरे यांनी केले आभार डॉ दिनेश क्षिरसागर यांनी मानले
पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर सोनावळे यांनी प्रास्ताविकात डॉ.कुमकर यांनी उत्तमरीत्या प्रशासकीय कामकाज करताना सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात भर दिला

यावेळी संभाजी लांगोरे म्हणाले डॉ.कुमकर यांनी लंपी साथीच्या आजाराच्या कालावधीत दिवस रात्र जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली सर्व जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करून सदर कालावधीत औषधांचा पुरवठा क्षेत्रीय स्तरावर केला त्यांच्या काळात साई ज्योती मध्ये जनावरांचे प्रदर्शन व शिर्डी येथे महाएक्सपो राज्यस्तरीय पशुधन प्रदर्शन भरवण्यात आले. त्यामध्ये देशातील विविध राज्यातून वेगवेगळ्या प्रकारची जनावरे आली होती त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. कुमकर म्हणाले जिल्ह्यातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अहमदनगर सारख्या भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या व दुग्ध उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात काम करण्याची मला संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो