नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; तिघे ठार, सहा जखमी

0
57

नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजता तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. अपघातात कांदिवली पूर्व (मुंबई ) येथील भावसार कुटुंबातील सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील इतर ६ सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना नगर येथील जिल्हा शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामध्ये इर्टीका कारमधील प्रीती धनंजय भावसार, वेदांत धनंजय भावसार, रोशन (चालक, पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. कांदिवली पूर्व (मुंबई) हे तीघे जागीच ठार झाले. जान्हवी अजय भावसार, अर्पिता धनंजय भावसार, ऋषिकेश अजय भावसार, धनंजय लकडु भावसार, जयेश प्रशांत भावसार, ओम प्रशांत भावसार (सर्व रा. कांदिवली पूर्व, मुंबई) जखमी झाले असून, हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर, पोकॉ मच्छिंद्र खेमनर, ज्ञानेश्वर साळवे, धोत्रे येथील आण्णा भांड, रंगनाथ भांड, अण्णा फाटक, बंटी मिडगे, विलास रोकड, बाबासाहेब भांड, राजू रोडे, सुभाष रोडे, विजय मेजर, दत्ता सासवडे, दत्ता भांड आदींनी मदतकार्य करून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.