वीस हजारांची लाच घेताना हवालदारास पकडले
अहमदनगर : भांबोरा (ता. कर्जत) येथील एका ग्रामस्थाविरूद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदारास पकडण्यात आले. अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (वय ५२) असे त्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो कर्जत पोलिस स्टेशन अंतर्गत राशीन दूरक्षेत्र येथे नियुक्तीला आहे. नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.






