शेंडी परिसरात मोठी कारवाई…गावठी कट्टे, जिवंत गोळ्यांसह आरोपी जेरबंद

0
1418

विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे कब्जात बाळगणाऱ्या महेश काशिनाथ काळे (वय २६, रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. शेंडी शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिस अंमलदार संदीप पवार यांनी एमआयडीसी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक व्यक्ती शेंडी बायपास, पांढरीपुल परिसरात गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, सुनील चव्हाण, मनोज गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शिंदे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. पथकाने दुचाकीवरून आलेल्या संशयीताला ताब्यात घेतले.