Home क्राईम न्यूज हॉटेलमधील वेटरला दमदाटी केल्याच्या राग दोघा मित्रांवर खुनी हल्ला, नगर तालुक्यातील घटना

हॉटेलमधील वेटरला दमदाटी केल्याच्या राग दोघा मित्रांवर खुनी हल्ला, नगर तालुक्यातील घटना

0
21

अहमदनगर-हॉटेलमधील वेटरला दमदाटी केल्याच्या रागातून दोघा मित्रांवर तलवार, लोखंडी रॉड व स्टिलच्या पाईपने खुनी हल्ला केल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात घडली. हल्ल्यात अक्षय आव्हाड व त्यांचे मित्र भाऊसाहेबआव्हाड जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी अक्षय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिनाथ मुरलीधर आव्हाड, संजय अंबादास आव्हाड, मंगेश संजय आव्हाड (सर्व रा. पांगरमल) व दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास पांगरमल ते मिरी रस्त्यावरील हॉटेल सुप्रीया (तात्याचा ढाबा) येथे ही घटना घडली. फिर्यादी व त्यांचा मित्र हॉटेलवर असताना वेटरला दम दिल्याच्या कारणावरून अजिनाथ व इतरांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर तलवार,लोखंडी रॉड व स्टिलच्या पाईपने खुनी हल्ला केला. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. जखमी अक्षय आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार, २५ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.