एम आय एम अहमदनगर दक्षिणेतून निवडणूक लढविणार- डॉ परवेज अशरफी
अहमदनगर – महाराष्ट्रातील राजकारण सध्या ढवळून निघाले असून कोण कोणत्या पक्षात आहे आणि किती वेळ त्या पक्षात राहाणार याची कोणतीच शाश्वती नसल्याचे चित्र दिसते.
सकाळी एका पक्षात असतात तर संध्याकाळ पर्यंत विकासाच्या नावावर दुसर्या पक्षात जातात. सकाळी ज्या पक्षाचे धोरण कसे चुकीचे हे जनतेला सांगत असतांना संध्याकाळी तोच पक्ष देशासाठी किती सक्षम आहे हे जनतेला सांगत असतात.
यात कार्यकर्ते यांची खूप गोची झाली असून नेते पुढे शहाणपण नाही अशी अवस्था झाली आहे.
यात सर्वात मोठा विश्वासघात जनतेचा झालेला आहे. हे नेते पुढारी स्वताच्या फायदा साठी सकाळ दुपार संध्याकाळ पक्ष बदलत असतात आणि जनतेचे विकासाला केराची टोपली दाखवतात. ज्या जनतेने एका विशिष्ट पक्षाला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी मतदान केले त्याच जनतेचा विश्वासघात घात करून हे पुढारी पक्ष बदलतात.
याच बरोबर विकासाच्या नावावर फक्त आणी फक्त निराशा अहमदनगरच्या जनतेला मिळाल्याचा चित्र आहे. जनतेला पर्याय पाहिजे , विकल्प पाहिजे, ते देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाने महाराष्ट्रातील काही लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतले असल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
या अनुषंगाने एम आय एम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांची भेट घेऊन अहमदनगर दक्षिण बाबत चर्चा केली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती देऊन पक्ष कसे निवडणूक रिंगणात आपले उमेदवार देऊ शकतात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
एम आय एम च्या माध्यामातून ज्या प्रकारे औरंगाबाद मध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जनतेचे कामे केलीत , नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले, अनेक प्रश्न मार्गी लावले त्याच प्रकारे अहमदनगर मध्ये औरंगाबाद पॅटर्न राबवण्याचा गरज असल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. लवकरच खासदार इम्तियाज जलील व डॉ गफ्फार कादरी अहमदनगर दक्षिण बाबत राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदउद्दीन ओवेसी यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याने अहमदनगरच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे.
महाराष्ट्राच्या सध्याचे गढूळ राजकारणाला नागरिक वैतागले असून अहमदनगर मधेच नव्हे तर पूर्ण देशात एम आय एम पक्ष हा पर्याय ठरू शकतो लवकरच खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्रातील एम आय एम पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीत कुठे कोणती भूमिका ठेवायची याची माहिती देणार असल्याचे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.