नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी गुंडेगावातील अवैध धंदे (दारू ) बंद केल्याच्या रागातून गुंडेगावातील आरोपी दिपक भरत माने याच्या सह अनोळखी तीन इसमाने सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांच्यावर खुनी हल्ला करून जमखी केले असून आज अहमदनगर चे पोलीस अधीक्षक (sp ) राकेश ओला साहेब यांच्या आदेशानंतर तात्काळ आरोपी दिपक भरत माने याच्या सह तीन आरोपी वर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 कलमानुसार 324,323 504,506 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी गुंडेगावातील दारू बंदी बाबत पत्रव्यवहार करून गावातील दारू बंद केली होती याचा राग मनात धरून गुरुवार दि 24/11/2022 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास भाऊसाहेब शिंदे व भापकर गुरुजी शिंदे यांच्या घरासमोर उभे असताना तिथे गावातील दिपक भरत माने याच्या सह अनोळखी तीन आरोपी येऊन गावात दारू बंद का केली त्यामुळे मला गावात दारू मिळत नाही त्यावेळी भाऊसाहेब शिंदे म्हणाले आम्ही दारू बंद केल्यामुळे लोकांचे संसार वाचले असून त्याचे कल्याण होत आहे याचा राग आल्याने दिपक भरत माने याने लाकडी काठीने भाऊसाहेब शिंदे यांच्या उजव्या मनगटावर दोन तीन वेळा जोराने मारले यावेळी राजाराम भापकर गुरुजी भांडण सोडवण्यासाठी मधी आले असताना आरोपी दिपक माने याने भापकर यांना ढकलून दिले त्यामुळं त्याच्या डाव्या पायाच्या नडगीवर जखमी झाले त्यानंतर आरोपी दिपक माने याच्या सह तिघांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली, मी गावात दारू पिणार काय करायचे ते करा म्हणून सत्तूरणे तुकडे तुकडे करून टाकण्याची धमकी दिली .
भाऊसाहेब शिंदे यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी प्रशासनास आत्मदहाना चा इशारा दिल्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास देऊन तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या नंतर गुंडेगावातील दारू बंद झाली होती.
Home क्राईम न्यूज गावातील अवैध धंदे बंद केल्याचा राग, नगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांवर खुनी हल्ला...






