अहमदनगरचं नामांतर होणार… भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य…

0
28

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले आहे. तर उस्मानाबादचे धाराशीव असं नामांतर करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून नाव बदलण्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रात्री उशिरा राज्य सरकारनेही राजपत्र जारी करत याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट पडळकर यांनी केलंय.दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे व आमदार महादेव जाणकर यांनी विधानपरिषदेत केली होती.