अहमदनगर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयास मंजूरी देण्याचे ऊपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीष महाजन यांचे जिल्हा भाजपा पदाधिकारी यांना आश्वासन
मुंबई – विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीशजी महाजन यांची अहमदनगर जिल्हा भाजपा पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रदेश कार्यकारण सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, मा वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष ॲड अभय आगरकर, मा सचिन पारखी, मा किशोर बोरा, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मा सुभाष दुधाडे सहभागी होते.
राज्य सरकारने नुकतीच विधिमंडळात १२ शासकीय वैद्यकिय महाविद्यालये नव्याने स्थापन करण्याची घोषणा केली त्या अनुशंगाने ऊपमुख्यमंत्री व वैद्यकिय शिक्षण मंत्री यांची शिष्टमंडळाने भेट घेतली
अहमदनगर हे मराठवाडा व विदर्भाचे प्रवेशद्वार मानले जाते, तसेच भौगोलिक व विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, व पन्नास लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. मात्र असे असताना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षीच्या काळात अद्याप पर्यंत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय स्थापन होऊ शकले नाही, हे महाविद्यालय नसल्याने जिल्ह्यातील नागरीकांना दुर्धर आजारांच्या मग अपघात असेल साथीचे आजार, अशा वेळी पुणे, मुंबई येथे ऊपचारांसाठी जावे लागते, त्यांच बरोबर बीड, धाराशीव अशा मराठवाड्यातील जिल्ह्यातीलही रुग्नांना ही नगर येथे वैद्यकिय महाविद्यालय झाल्यास सोईचं असेल.
त्यांच बरोबर नगर येथे आवश्यक ती जमीनही ऊपलब्ध आहे या सर्व बाबी शिष्टमंडळाने ऊपमुख्यमंत्री ना देवेंद्र जी यांच्या निदर्शनास आणल्या
अहमदनगर जिल्हा भाजपा च्या शिष्टमंडळाची भूमिका समजाऊन घेऊन अहमदनगर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर करण्याचे आश्वासन ऊपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीश महाजन यांनी दिले.






