निंबळक- नागपुर एमआयडीसी ते निंबळक बाहय वळण रस्त्याच्या अपुर्ण काम आंदोलन चा इशारा

0
21

निंबळक- नागपुर एमआयडीसी ते निंबळक बाहय वळण रस्त्यापर्यत रस्त्याच्या अपुर्ण काम बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ पुर्ण करावे याबाबतचे निवेदन पंचायत समिती उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. काम पुर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी दि.२३ फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलन चा इशारा डॉ.पवार यांनी दिला आहे.

निंबळक बाह्यवळण ते नागापूर एमआयडीसी याबाबत रस्त्याबाबत संबधीत विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र आजूनही हे काम पूर्ण झाले नाही. जे काम झाले होते तेही खड़े पडून खराब झाले आहे. २२ कोटी रुपये खर्च करुन या रस्त्याचे काम दिड वर्षापूर्वी झाले झाले. मात्र अजुनही या रस्त्यावरील डांबरीकरण गटार, दुभाजक व पथदिव्यांचे काम अजून झाले नाही. दुभाजक नसल्यामुळे वाहने कशी ही मध्ये घुसतात यामुळे दररोज अपघात पहावयास मिळत आहे. या रस्त्यावर दुभाजक व पथदिव्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे.
तसेच एमआयडीसी ते निंबळक हा रस्ता गेली तीन वर्षापासून पूर्ण खराब आहे. या रस्त्यावरून माल वाहतूक गाडया जात आहे . रस्ता खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. या रस्त्या दुरुस्ती बाबत एमआयडीसी कडे मागणी केल्यावर तात्पुरती डागडूजी केली जाते. मागील वर्षी या संदर्भात आपण बैठक घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अद्याप कुठलीही काम झाले नाही. प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असून येत्या दहा दिवसात कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास गुरुवार दि २३ रोजी घंटानाद आंदोलन चा इशारा डॉ दिलीप पवार यांनी दिला आहे.