सलीमखान पठाण उद्या आकाशवाणीवर
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार व गेली २६ वर्षे रमजानुल मुबारक या स्तंभाद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून स्तंभ लिहिणारे स्तंभलेखक श्री. सलीमखान पठाण यांचे ”रमजान ईदचं महत्व” या विषयावर माहिती पर भाषण उद्या शुक्रवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी १०.१५ वाजता आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
आकाशवाणी अहमदनगर केंद्र १००.१ MHz आणि NewsOnAIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम जगभरात कुठेही ऐकता येईल.तरी रमजान ईद निमित्ताने प्रसारित होणाऱ्या या भाषणाचा सर्व रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Listen to AIR Ahmednagar Radio live on Prasar Bharati’s NewsOnAir App. Download the App from https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews.