उमेश लगड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
456

अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरीक उमेश श्रीकांत लगड, बी.टेक.कृषी,एम्.बी.ए. -वय:५० वर्षे. यांचे नुकतेच . हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले
उमेश लगड यांचे नाव कृषी क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव होते.स्वत:ची सेवा ही संस्था, कृषी सह्याद्री हा फळ प्रक्रिया उद्योग , अनेक फळ उत्पादक शेतकरी गटांचे प्रवर्तक,त्याच्या दिल्ली-कोलकता तसेच देश-विदेशातील फळ मार्केटींगचा आधार होते. शांत,मनमिळाऊ आणि सर्वांचा आधार असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते.. कोळगाव ता.श्रीगोंदा येथील मुळ गाव असणारे व बालिकाश्रम रस्त्यावरील शिंदे मळ्यातील रहिवासी असणारे एस्.एन्. लगड सर व सौ.प्रमिला लगड या निवृत्त शिक्षक दांपत्याचे जेष्ठ चिरंजीव व डाॅ.अविनाश मोरे यांचे भाचे होते. रविवार .त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी,भाऊ-बहिणी आहेत. मार्केट यार्डमधे कृषी तंत्रज्ञान, ठिबक सिंचन व फळ मार्केटिंग क्षेत्रात त्यांचा सल्ला मोलाचा मानला जात असे..जिल्ह्याभरात त्यांचे चाहते होते.. त्यांचा मोठ्या नातेवाइकांचा गोतावळा व प्रचंड मोठा मित्रपरीवार आहे.. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे