आरोपीस अटक न झालेच्या निषेधार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
मिरजगाव व मढी येथील ग्रामसेवकांवर झालेल्या हल्ला आणि मारहाण याबाबत मिरजगाव येथील आरोपीला अद्याप अटक झालेली नसलेने आज दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी साडेचार वाजता जिल्हा परिषद अहमदनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर यांची भेट घेण्यात आली.यावर कार्यवाही तात्काळ न झाल्यास जिल्हाभर असहकार आंदोलन आणि मोर्चा बाबत नियोजन केले जाणार आहे.असे सन्माननीय राज्याध्यक्ष श्रीयुत एकनाथरावजी ढाकणे साहेब आणि जिल्हा सरचिटणीस अशोकराव नरसाळे आणि पदाधिकारी यांनी घेतलेल्या भेटीत सांगणेत आले.