नगर पुणे रोडवर ‘एक्साईज’ची मोठी कारवाई, १ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त… Video

0
5382

अहमदनगरला पळवे शिवार नगर-पुणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

१ कोटी २१ लाख ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पर राज्यातील विदेशी दारुची वहातुक करणारा कंटेनर व त्यातील १५५० बॉक्स विदेशी दारु जप्त

अहमदनगर : अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगांव, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. १ अहमदनगर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे समन्वयाने दिनांक १६/६/२०२२ रोजी हॉटेल गारवा समोर पळवे शिवार, नगर-पुणे रोड ता. पारेनर जि. अहमदनगर येथे गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्याने भरलेला कंटेनर जप्त करण्यात आलेला आहे. सदर कंटेनर मध्ये ७५० मिलीचे विदेशी मद्याचे एकूण ६०० बॉक्सेस तसेच १८० मिलीचे ९५० बॉक्सेस कंटेनर क्रमांक एम.एच.०४ इएल ६०५० मधून वाहतुक करीत असताना विदेशी मद्यासह कंटेनर वाहन चालक प्रदिप परमेश्वर पवार, रा. तांबोळी ता. मोहोळ जि. सोलापूर यांचे ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे.
सदर परराज्यातील विदेशी मद्याचा जप्त करण्यांत आलेले बॉक्सेस बाबत वाहन चालकास अधिकची चौकशी केली असता त्याने सदर विदेशीमद्य साठा गोवा राज्यातील महाराष्ट्राचे सीमेजवळ विदेशी मद्याने भरलेला कंटेनर ताब्यात घेऊन नाशिक येथील टोलनाक्यावर घेऊन जात असल्याचे सांगितले आहे.

रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मिलीचे ६०० बॉक्सेस व मुंबई सेंट्रल व्हिस्की १८० मिलीचे ९५० बॉक्सेस जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याची तसेच कंटेनरची एकूण अंदाजे १,२१,५०,५००/- (एक कोटी एकवीस लाख पत्रांस हजार पाचशे रुपये) मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याची वाहतुक केल्याबाबत अटक करण्यांत आलेल्या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून सदर गुन्हयामध्ये बापू भोसले, खवनी, ता. मोहोळ, जि. सोलापूर, निखील कोकाटे, रा. तांबोळी ता. मोहोळ, जि. सोलापूर यांचा प्रथम दर्शनी सहभाग दिसून येत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १ चे निरीक्षक ओ.बी.बनकर हे करीत आहेत.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक, (अंमलबजावणी व दक्षता ) मुंबईचे सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त, पुणे अनिल चासकर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क, पुणेचे सी.बी.राजपुत, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगांवचे दुय्यम निरीक्षक महिपाल धोका, राज्य उत्पादन शुल्क तळेगांव दाभाडे, जि. पुणेचे दुय्यम निरीक्षक दिपक सुपे यांचे समन्वयाने कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश द. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्र.उपाधिक्षक बी.टी. घोरतळे, भरारी पथकाचे निरीक्षक ओ. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट, श्री. ढोले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय विधाटे, तुळशीराम करंजुले, जवान निहाल उके, सुरज पवार, एन. आर. ठोकळ महिला जवान, श्रीमती शुभांगी आठरे सदर कारवाईत सहभागी होते.