महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी असाच फलक लावला होता. त्यांच्या या फलकावरून आधी खासदार सुजय विखे आणि आता माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी थोरातांना खोचक टोला लगावला. भावी मुख्यमंत्र्यांना आमदारकी तरी मिळेल का? असा टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी लगावला आहे.
ज्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकत आहे ते परत आमदार म्हणून तरी निवडून येतील की नाही याची खात्री त्यांना नाही. म्हणून अशी स्टंटबाजी करून काही तरी मते आपल्याला मिळतील यासाठी हे सगळं सुरू असल्याचे कर्डिले म्हणाले. कर्डिले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षातील आजी माजी पदाधिकार्यांसाठी नगर शहरातील आम्रपाली गार्डन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे उपस्थित होते.
महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकत आहे. यावर बोलताना कर्डिले म्हणाले, आज घडीला तरी यांचे केवळ १० भावी मुख्यमंत्री दिसत आहे. मात्र विधानसभा निवडणुका आल्या की यांचे जवळपास ५० भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकतील. असे येत्या काळात दिसून येत की काय असे चित्र दिसते, अशा शब्दात कर्डिले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
तलाठी भरती प्रक्रिया
Comments are closed.