श्रीरामपुरचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांचे राज्य सरकारच्या आदेशाने निलंबन करण्यात आले आहे. काम अनियमितता, योजनांची अंमलबजावणी करतांना चुका या धस यांना नडल्या आहेत. निलंबनासह धस यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
धस यांनी न्यायालयाचे निर्देशाचे पालन न करता विकास कामांना मंजुरी दिली. तसेच घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर न सोडणे, ग्रामपंचायत ऑडिट पॅरे याकडे दुर्लक्ष करणे, संशयित अपहार प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे, स्वच्छ भारत अभियानात अनियमीतता, अनूसुचित जाती व बौद्ध घटकांचा विकास योजनेत अनिमितता करणे, पानंद रस्त्यांच्या कामांना मान्यता देवून ते पुर्ण न करणे आदी ठपका धस यांच्यावर आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी धस यांच्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला होता






