विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मोठा दावा करत “शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देणार अशी भाजपाने अट ठेवली आहे”, असे म्हटले होते. आता याच दाव्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वड्डेटीवारांवर जोरदार निशाणा साधला.
लोकप्रियता मिळवण्यासाठी असे दावे केले जातात, मात्र, वड्डेटीवारांनी अशा प्रकारचा दावा कशाच्या आधारावर केला, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे”, असे विखे पाटील म्हणाले. “काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याला दुजोरा देवून काँग्रेसमध्ये सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ची स्थिती आहे”, असे महसूलमंत्री विखे पाटलांनी म्हटले आहे.