अहमदनगर-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश हुच्चे आणि नंदू बोराटे यांना पुणे येथूनताब्यात घेतले होते मात्र संदीप गूडा फरार होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह तोफखाना पोलिसांचे पथक संदीप गुडा याच्या मागावर होते अखेर तोफखाना पोलिसांना संदीप गुडा याचा ठावठिकाणा लागल्यावर तोफखाना पोलिसांनी त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.ओंकार भागानगरे यांच्या खून प्रकरणातील सर्व मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात सात आरोपी झाले आहेत.