पाथर्डी:-शहरातील सराफ व्यावसायिक राजेंद्र उर्फ बंडू शेठ चिंतामणी यांच्यावर चोरट्याने धारदार शास्त्रानेवार करून गंभीर जखमी केले या घटनेतील आरोपीचा शोध लावावा व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखावी या मागणीसाठी पाथर्डी शहर बंद करून पाथर्डी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी काढला यामध्ये व्यापारी ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याप्रसंगी अँड.प्रताप ढाकणे,राहुल राजळे,अभय आव्हाड,सुभाष घोडके,अशोक गर्जे, गोकुळ दौंड मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे,शिवसेना तालुकप्रमुख विष्णुपंत ढाकणे, सागर गायकवाड, डॉ मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर,अमोल गर्जे, काकासाहेब शिंदे,किसन आव्हाड, मुकुंद गर्जे,मुकुंद लोहिया,संतोष जिरेसाळ,अरविंद सोनटक्के,बंडू भांडकर, रामनाथ बंग, अजय भंडारी,वैभव शेवाळे,रविंद्र पथरकर,महेश बोरुडे,रणजीत बेगळे, प्रसाद आव्हाड, रविंद्र वायकर, सुनिल ओव्हळ, सचिन नागापुरे, प्रशांत शेळके आदी उपस्थित होते.