लवकरच नगर ते पुणे ट्रायलबेस इंटरसिटी रेल्वे,रेल्वेमंत्री दानवे यांच्याकडे पाठपुरावा

0
23

अहमदनगर-अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नगर-पुणे रेल्वे शटल सेवा सुरू करण्याची मागणी लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. यासाठी आवश्यक ती पूर्तता झाली असून लवकरच या मार्गावर ट्रायलबेस रेल्वे सेवा सुरू होणार आहे. नगर-पुणे रेल्वेसेवेसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठपुरवा सुरू आहे. नगर-पुणे रेल्वेसेवेचे नगरकरांचे हे स्वप्न आता नक्की साकार होणार होणार असल्याचा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी नगरमध्ये खा. डॉ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा सध्या राज्यात गाजत असलेल्या प्रश्नावर छेडले असता खा. विखे म्हणाले, केवळ एमआयडीसी मंजूर करून काम भागत नाही. राज्य सरकार तेथे जागा आणि सुविधा देते. मात्र, तेथे चांगल्या कंपन्या येण्यासाठी, त्या सुरळीत चालण्यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागतो. जेथे एमआयडीसी सुरू करायची आहे.