लाजीरवाणा प्रकार….नगरमध्ये आईच्या मर्जीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपींना अटक

0
1114

राहाता : लग्नाआधी आईच्या इच्छेनुसार परपुरूषाशी संबंध ठेवण्याची प्रथा आहे असं सांगत नगर जिल्ह्यातील एका खेडय़ात अघोरी प्रकार करण्नायास नकार देणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात या मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तसेच मुलीच्या आईच्या विरोधात बाल लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

याबाबत मुलीच्या आतेभावाने राहाता पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. १ सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तिला सांगितले, की ‘आपल्या समाजाच्या चालीरीतीप्रमाणे तुला परपुरुषाशी संबध ठेवावे लागतील.’ तेव्हा या मुलीने आईला आईला विरोध केला. ६ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे पीडित मुलीच्या घरी आला. त्या वेळी पीडितेच्या आईने तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. या वेळी आरोपीस पीडितेच्या आईने मदत केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.