ahmednagar दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला, पोलीस पथकाने आरोपींच्या आवळल्या मुसक्या

0
786

अहमदनगर : दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी चार आरोपीं च्या पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी रोडवर सातपीर बाबा दर्गा परिसरात आज पहाटे ही घटना घडली. सुमारे एक तास सुरू असलेल्या या थरारा दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यांवर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केलाय. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयुर राजू ढगे, ईश्वर अशोक मोरे, रमेश वाकोडे आणि रणजित केशव कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दरोडे टाकत असतानाच गुप्त बातमीदाराकडून पोलीस पथकाला याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा पाठलाग केला.
दरोडेखोरांनी प्रथम वाचमनला मारहाण करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खुर्चीवर बांधून ठेवले. नंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे 42 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिने चोरले. त्याचबरोबर त्यांच्या शेजारच्या दोन घरात दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत होते.