नगर : तू नावासमोर सिंग का लावतो. पगडी का घालतो, केस का राखतो, हातात कडे का घालतो. आमच्या शाळेत यायचे असेल तर हे सगळे काढून टाक आणि इतर मुलांप्रमाणे राहा. यासाठी इतर धर्माचा स्वीकार कर किंवा ख्रिश्चन धर्मात ये, असे एका शीख विद्यार्थ्याला बजावणाऱ्या राहुरीतील मिशनरी शाळेच्या उप मुख्याध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. त्याच्या बाबतीत डीपल इंग्लीश मेडीयम स्कुल राहुरी फॅक्टरी येथे हा प्रकार घडला आहे. शाळेच उपमुख्याध्यापक फादर जेन्म यांच्याविरूद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.