अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक शासकीय वाळू डेपो सुरू होणार

1
26

शिर्डी, दि.२३ जून २०२३ – कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी केले आहे.

शासकीय वाळू धोरणानुसार हे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात येणार आहेत. या डेपोतून प्रत्येकाला ६०० रूपये ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना , रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकूल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवीन वाळू धोरणानुसार सुरू होणाऱ्या या वाळू डेपोमुळे अवैध वाळू उत्खन्न व वाहतूकीवर आपोआपच बंदी येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक शासकीय वाळू डेपोमधून स्वस्तात वाळू खरेदी करणार आहेत.असे ही श्री.भोसले यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. प्रत्येक तालुक्यात असे देत तयार करून नागरिकांना याचा लाभ घेता आला पाहिजे…

Comments are closed.