नगर शहरातील पारिजात चौकातील आग.. आ.संग्राम जगताप संतापले.. म्हणाले…

0
50

उपनगरात पारिजात चौकात पत्र्याच्या दुकानांना लागली आग

आगीच्या घटनेला महापालिका आयुक्त जबाबदार – आ. संग्राम जगताप

अहमदनगर शहरातील पारिजातक चौकातील पत्र्यांच्या दुकानांना आज दुपारी वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत 5 ते 6 दुकानांचे प्रचंड नुकसान झाले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही
आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आणि एम आय डी सी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय मात्र, ही पत्र्याची दुकानं अनधिकृत असून अशा घटना शहरात वारंवार घडत आहे त्यातच मनपाचे अग्निशमन दल सक्षम नाही असं म्हणत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या सर्व घटनांना महापालिका आयुक्तांना जबाबदार धरलं आहे अनधिकृत दुकानांवर महापालिकेने कारवाई करावी, जिथे शक्य असेल तिथे महापालिकेने सर्वे करून अधिकृत दुकानांना परवानगी द्यावी तसेच मनपाच्या अग्निशमन दलात मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून अग्निशमन दलात भरती करावी असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलं आहे.