महाआघाडीच्या मेळाव्यात गाडे यांचा कर्डिलेंवर घणाघात म्हणाले…video

0
30

नगर बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ आमदार तनपुरे , आमदार निलेश लंके व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या हस्ते झाला . यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे होते . यावेळी तनपुरे म्हणाले की , नगर बाजार समितीच्या रेकॉर्ड तपासल्यानंतर सुडाचे राजकारण करता आले असते पण ती आपली संस्कृती नाही . बाजार समितीच्या कारभाराला वैतागलेले मतदारच आता परिवर्तन करून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना शेवटचा ठोका देतील .
यावेळी आमदार लंके म्हणाले की , राजकारणात दादागिरी नाही तर नम्रता चालते . ती फक्त महाआघाडीकडेच आहे . कोणाची यत्रंणा कशीही राबवा पण माझी यत्रंणा रात्रीनंतर सुरू होते . नगर तालुक्यात परिवर्तन होऊन महाआघाडीचाच गुलाल राहणार.
यावेळी शेलार म्हणाले की , नगर जिल्हा दूध संघ विकुन त्याचे वाटोळे करणारे आता नगर बाजार समितीची जागा विकुन त्यात मलिदा खाण्याच्या तयारीत आहेत .मतदारांनी याची जाणिव ठेऊनच मतदान करावे . यावेळी प्रा . गाडे यांनी कर्डिले यांच्यावर आक्रमक होऊन टिका केली . ते म्हणाले की , नगर बाजारात समितीत व्यापाऱ्यांना प्रथम तर शेतकऱ्यांना दुय्यम स्थान आहे .बाजार समितीचा कोंडवाडा , कांदा शेडची जागा विकुन त्यातुन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार सत्ताधाऱ्यांनी केला .कर्डिले यांना आता कधीच आमदार होऊ देणार नाही. तालुक्यातील सहकारी संस्थाची वाट लावणाऱ्यांच्या हातात पुन्हा बाजार समितीची सत्ता देऊ नका .
यावेळी संपतराव म्हस्के , रावसाहेब शेळके , प्रताप शेळके , भगवान फुलसौंदर , विक्रम राठोड , किरण काळे , बाबासाहेब गुंजाळ , माधवराव लामखडे , बाळासाहेब हराळ , रोहिदास कर्डिले , संदिप कर्डिले , रघुनाथ झिने, अजय लामखडे , डॉ . बबन डोंगरे, राजेंद्र भगत , प्रकाश कुलट, रामदास भोर, अभिषेक भगत आदि उपस्थीत होते .