अहमदनगर :
शेवगांव शहरामध्ये भर वस्तीत मारवाड गल्ली मधील आडात व्यापारी दगडूशेठ बलदवा यांच्या घरी दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यु एक जाण गंभीर जखमी. घटनास्थळी पोलीस दाखल शहराच्या मुख्य भागात पहाटे पडला दरोडा.
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत पुष्पा हरीकिसन बलदवा, गोपीकिसन गंगाभिसन बलदवा यांचा मृत्यू झाला असून सुनीता गोपीकिसन बलदवा ( सर्व. रा. मारवाडगल्ली ) ह्या जबर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे
शहराच्या मध्यवस्तीत चंद्र प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगावकडे रवाना झाल्याचे माहिती मिळाली आहे.