पोलिसांवर तडीपार आरोपीचा प्राणघातक हल्ला..!नगर जिल्ह्यातील घटना..

0
38

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस ठाण्यात चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटना 26 ऑगस्ट रोजी रात्री 10.20 वा दरम्यान घडली आहे.बातमीची हकीकत अशी की, 26 ऑगस्ट 2023 रोजी यातील फिर्यादी चालक पोकॉ/दादाराम शिवराम मस्के धंदा नोकरी,नेम.श्रीगोंदा पोलीस ठाणे,ता.श्रीगोंदा व यातील साक्षिदार हे श्रीगोंदा ते कर्जत जाणारे रोड लगत असणारे कॅनॉलचे 12 नंबर चारीचे जवळ असणारे पत्राशेडजवळ कत्तली करीता डांबुन ठेवलेल्या जनावरांचे माहीती बाबतची खात्री करणे करीता गेले असता,आरोपी 1) अतीक गुलामहुसेन कुरेशी, रा.कुरेशी गल्ली,श्रीगोंदा,ता. श्रीगोंदा 2) नदीम महम्मद कुरेशी, रा.श्रीगोंदा,ता. श्रीगोंदा,3) ओंकार दशरथ सायकर रा.राहु,ता.दौंड,जि. पुणे, 4) समद कादरजी कुरेशी रा.करमाळा,ता. करमाळा,जि.सोलापुर यांनी संगनमत करुन,त्यांचे कडील स्विप्ट कार फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे अंगावर घालुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की करुन शिवीगाळ दमदाटी केली.तसेच, शासकीय वाहनास धडक देवुन वाहनाचे नुकसाण केले व फिर्यादी व साक्षीदार काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला.यात मिळुन आलेली 12 लहान गोवंश जातीची वासरे, 2 गायी,1 गावरान गायी,1 साहीवल जातीची गायी इत्यादी जनावरांना निर्दयपणे वागणुक देवुन त्यांना कत्तलीकरीता डांबुन ठेवले. आरोपी नामे अतीक गुलाम हुसेन कुरेशी,रा. कुरेशी गल्ली, श्रीगोंदा,ता.श्रीगोंदा यास पोलीस अधिक्षक यांनी अहमदनगर जिल्हा स्थळसिमेचे हददीतुन हददपार केलेले असताना तो विनापरवाना बेकायदा अहमदनगर जिल्हयाचे स्थळसिमेचे हददीत मिळुन आला असल्याने तो पोलीसांना पाहुन पळुन गेला.