अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, सोयाबीन बाजार भाव

0
3392

श्रीरामपूर -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील कांदा मार्केटमध्ये उन्हाळी काद्याला 3401 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 5271 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत. कांदा मार्केटमध्ये 36 साधने म्हणजे एकूण 420.11 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 2300 ते जास्तीत जास्त 3401 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 1500 ते 2250 व नंबर 3 कांदा 300 ते 1450 तसेच गोल्टी कांदा 1400-2200 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले.

मार्केटमध्ये 9071 गोणी कांदा आवक झाली असून एकूण 4980 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांदा 1 नंबर-2350 ते 3500, कांदा 2 नंबर 1500 ते 2300, कांदा 3 नंबर 300 ते 1450, गोल्टी कांदा 1450 ते 2000 भाव निघाले आहेत. भुसार मार्केटमध्ये एकूण 82 क्विंटल मालाची आवक झाली असून त्यात सोयाबीनची 62 क्विंटल आवक होऊन 4800 ते 5271 तर सरासरी 5000 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.