नगर तालुका बाजार समिती रणधुमाळी…खा विखे,कर्डिलेंनी घेतला विरोधकांचा समाचार…

0
37

अहमदनगर प्रतिनिधी : जिल्ह्यातील शेतकरीने पिकवलेल्या कांदा मालाची निर्यात जलद गतीने होण्यासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माध्यमातून विळद येथील धक्क्या वरून आयात केले जाईल. तसेच नेप्ती उपबाजार समिती मध्ये कांद्याची वाहतूक करण्यासाठी नगर पुणे हायवे पासून नेप्ती उप बाजार समिती पर्यंत स्वतंत्र रस्त्याची निर्मिती करणार आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी किसान रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा विजय होतील.नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोना संकट काळामध्ये शेतकऱ्यांना कोविड सेंटरचे उभारणी करून आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिली होती. केंद्र व राज्य सरकारचा विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजप शिवसेनेचे सरकार कटिबद्ध आहे असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी निमित्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार सुजय विखे पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, युवा नेते अक्षय कर्डिले,दादाभाऊ चितळकर, अरूण होळकर, संभाजी लोंढे,दिलीप भालसिंग,भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अशोक झेरेकर,केशवराव अडसूरे, हरिभाऊ कर्डिले, बाजीराव गवारे, अभिलाष घिघे,दत्ता नारळे, रमेश भामरे, विलास शिंदे आदीसह नगर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षां मध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेतले. बाजार समितीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ निर्माण करून दिले आहे. भानुदास कोतकर यांच्या प्रयत्नातून नेप्ती उपबाजार समितीची निर्मिती केली व राज्यामध्ये कांदा मार्केटला नावलौकिक मिळून दिले. खासदार शरद पवार यांनी नेप्ती बाजार समितीच्या कामाची दखल घेऊन भानुदास कोतकर यांना बोलावून माहिती घेतली व त्यांच्या कामाचे कौतुक केले. जेव्हा जेव्हा नगर तालुक्यावर दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले तेव्हा तेव्हा बाजार समितीचे माध्यमातून चारा छावण्या उभ्या करून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्याचे काम केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी आपल्या आजोबाचे नाव धुळीत मिळवण्याचे काम केले आहे कारखान्यावर कर्ज काढून कारखाना व सूतगिरणी बंद करण्याचे काम केले खासदार सुजय विखे यांनी कारखान्यामध्ये लक्ष घालून कारखाना सुरू केला व कामगारांना न्याय मिळवून दिला. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना दोन अंकी पेक्षा जास्त मते मिळणार नाही. माझ्यावर टीका करून चर्चेत राहण्याचे काम हे पुढारी गेले वीस वर्षापासून एकत्रितपणे करत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग आत्ता झाला आहे मात्र माझ्या विरोधात गेले वीस वीस वर्षापासून महाविकास आघाडी कार्यरत
विरोधकांचा समाचार घेताना सुजय विखे म्हणाले की विरोधकांकडे कुठलेही विकास कामा बाबत दिशा नाही की त्यांच्याकडे वैचारिक पात्रता , केवळ विरोध करायचा म्हणून ते धादांत खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण भीक घालत नाहीत, आपले नाणे खणखणीत आहे त्यामुळे आपण कोणाचाही विचार करत नाहीत. विखे पाटील घराण्यांनी आजवर गोरगरीब जनतेसाठी काम केले आहे आणि तोच वारसा आपणही पुढे चालवत असून आमच्या वर कुठलाही डाग नाही हाच पोटशूळ विरोधकांना सतावत असतो म्हणुच ते आमच्यावर टीका करतात. आपली या जनतेशी बांधिलकी असून कायम यांच्या उध्दारा करिता काम करू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी उपस्थित मतदारांना दिली.