‘आता एकच निश्चय’…’कार्ले’ यांचा फेसबुक पोस्ट द्वारे मोठा ‘संदेश’……

0
41

नगर: नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजना सातत्याने नफ्यात चालवून दाखवणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना पदावरून हटविण्यात आले आहे. आता या पाणी योजनेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र कडुस यांची निवड झाली आहे. या मुद्द्यावर भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर संदेश कार्ले यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. कार्ले यांनी म्हटले आहे,

*_पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातातच….!!!_*

*_आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट,प्रामाणिकपणे वागा शिंतोडे उडवणारे लोक येतात शिंतोडे उडवतात आणि निघून जातात…..फक्त त्या शिंतोड्यामुळे आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो….!!
आणि हाच विचार मनात धरून मनातील तो निघून गेला अनेक मित्रांनी प्रतिक्रिया दिल्या काहींनी जाहीर दिल्या, तर काहींनी भेटून,फोन करून दिल्या खूप मोलाच्या आहेत की ज्या कुणालाही मिळत नसतील म्हणून एकच निश्चय जनतेच्या बाबतीत चुकीच्या वागणाऱ्या ना घरी पाठवायचेच आणि तेही तुमच्या सर्वांसारख्या चांगल्या माणसांच्या साथीने.