अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस,हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त

0
40

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पारनेर, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, नगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, कलिंगड, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यात खडकवाडी येथे झालेल्या गारांच्या पावसामुळे कलिंगड पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीची आकडेवारी समोर येईल