अहमदनगर – भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र मोहनीराज उर्फ भैय्या गंधे यांनी नगर अर्बन बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या प्रभारी अध्यक्षा सौ.दिप्ती गांधी यांच्या नावाने त्यांनी राजीनाम्याचे पत्र सोमवारी (दि.८) दुपारी बँकेत दिले आहे.
या राजीनामा पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, आपण आपल्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक कामकाजात व्यस्त असल्याने बँकेसाठी आपणास आवश्यक तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे बँकेच्या संचालक पदाला योग्य न्याय देता येत नसल्याने आपण हा राजीनामा देत आहोत. या साठी आपणावर कसलाही दबाव नाही. आपण माझा राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती गंधे यांनी केली आहे.
अर्बन बँकेच्या संचालिका संगीता दिपक गांधी यांनी मे महिन्यात संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्या नंतर बँकेचे चेअरमन राजेंद्र आगरवाल यांनीही चेअरमन पदासह बँकेच्या संचालक पदाचाही राजीनामा दिला होता.






