ज्या नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा आहे ते निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असून आम्ही आजी आहोत आणि जनतेच्या आशीर्वादाने भविष्यातही आजी’च राहणार आहोत असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी नगर येथे पक्षाच्या कार्यक्रमाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जे भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत येत आहेत त्यांच्या निवृत्तीपर्यंत ये भावीच राहणार आहेत. आमच्याकडून त्यांना शुभेच्छा असतील. कारण त्यांच्या पक्षांमधील आमदारांची संख्या पाहता जेवढे आमदार आहेत तेवढेच भावी मुख्यमंत्री म्हणून इच्छुक आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना सरकारला त्यांच्या कामाची पावती दिलेली आहे आणि भविष्यात पण देणार आहे. त्यामुळे आम्ही भावीच्या स्पर्धेत नसून सध्या आजी आहोत आणि भविष्यातही जनतेच्या विश्वासाने आजीच राहणार आहोत असा विश्वास खा.विखे यांनी व्यक्त केला.