मद्यधुंद प्रवाशाने विमानातच महिलेच्या अंगावर केली लघुशंका…

0
25

विमानात प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एअर इंडियातील ही 10 दिवसांतील दुसरी घटना समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. या प्रकरणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरुष प्रवाशाने लेखी माफी मागितल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सकाळी 9.40 वाजता एअर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. विमानतळ सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले की पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. आणि तो केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. त्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. यानंतर दिल्लीत सीआरपीएफने त्याला पकडले. त्यानंतर दोन्ही प्रवाशांमध्ये तडजोड झाल्यानंतर पुरुष प्रवाशाला सोडण्यात आले.