Airtel Recharge….एक वर्ष validity.. अनेक बेनिफिट

1
868

Airtel Recharge

सध्या एक वर्ष validity असलेल्या रिचार्ज प्लान्सला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. Airtel ने देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संपूर्ण १ वर्षाच्या वैधतेसह येणारे प्लान्स ऑफर करत आहे. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह ओटीटी बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. Airtel कडे वर्षभराच्या वैधतेसह येणारे असे दोन शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्सची किंमत ३,३५९ रुपये आणि २,९९९ रुपये आहे.

२,९९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. १ वर्षाच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा मिळेल. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळते. या प्लानसोबत यूजर्सला फ्री हॅलोट्यून आणि विंक म्यूझिकचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

३,३५९ रुपये किंमतीचा शानदार रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस म्हणजेच संपूर्ण १ वर्ष आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. यात यूजर्सला १ वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते

1 COMMENT

Comments are closed.