केरळमध्ये पक्षविस्तारासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी आज भाजपात प्रवेश केला. जवळपास दोन महिन्यांपूर्वी अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. गुजरात दंगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागाबाबत बीबीसीने डॉक्युमेंटरी केली होती. त्यावरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर नाराज होत अनिल अँटनी यांनी काँग्रेस सोडली होती.
ए.के. अँटोनी हे केरळचे दोन वेळेस मुख्यमंत्री राहिले आहेत. युपीए सरकारच्या काळात अँटनी यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. अनिल अँटनी यांनी केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली होती. आज, दिल्लीत अनिल अँटनी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही. मुरलीधरन, केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.