Amazon वरती व्हॅलेंटाईन डे निमित्त काही स्मार्टफोन्सवर ग्राहकांना विशेष ऑफर मिळत आहे. १० फेब्रुवारी रोजी Fab Phones फेस्ट सुरु झाला असून Realme, Redmi आणि इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना डिस्काउंट मिळत आहे. १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विक्री सुरु राहणार आहे.
Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये येतो. हा फोन Amazon वर खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर १००० रुपयांपर्यंत झटपट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय त्यांचे ग्राहक जुने स्मार्टफोन १८,०५० रुपयांमध्ये एक्सचेंक करू शकतात.
OnePlus Nord 2T 5G हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट मध्ये येतो. Amazon मध्ये या फोनवर ऑफर सुरु आहे. ग्राहकांना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर (Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड वगळता) १५०० रुपयांची झटपट सूट मिळू शकते.
Redmi K50i 5G हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनची किंमत ३१,९९९ रुपये असून , हा तुम्ही २३,९९९ रुपयांना डिस्काउंट ऑफरमध्ये खरेदी करू शकता. ग्राहकांना HDFC बँकेच्या कार्डने व्यवहार केल्यास १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. ग्राहक त्यांचे जुने स्मार्टफोन १९,५५० रुपयांपर्यत एक्सचेंज करू शकतात.






