अमोल मिटकरी म्हणाले… किरीट सोमय्या विक्रांत घोटाळा करून लपून बसले

0
492

अहमदनगर – पारनेर तालुक्यात आमदार नीलेश लंके यांच्या निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन कान्हूर पठार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना

अमोल मिटकरी म्हणाले, उठसूठ काल पर्यंत महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणारे किरीट सोमय्या विक्रांत घोटाळा करून कुठे लपून बसले आहेत. याचा शोध आता घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांचा जामीन नाकारला आहे. सोमय्या पिता-पूत्र दोघेही गायब आहेत. ते कुठे दडून बसले आहेत. गुजरातला पळून गेले, मुंबईत आहेत की नागपूरला आहेत की दिल्लीत अमित शहांकडे आहेत. याचा शोध घेतला पाहिजे. विक्रांत घोटाळा हे गंभीर प्रकरण आहे. सैनिकांच्या विषयी तो आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली