राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वीच ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. त्यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. शिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं प्रदर्शित केलं. अमृता यांना गाण्याची प्रचंड आहे. त्यांनी महाशिवरात्रीनिमित्तही एक गाणं इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलं आहे
जवळपास वर्षभरापूर्वी अमृता फडणवीस यांचं ‘शिव तांडव स्तोत्र’ गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला १३ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. आता महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत त्यांनी हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच सगळ्यांना हे गाणं ऐकण्यास सांगितलं आहे
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल महाशिवरात्रीनिमित्त अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्तोत्रम्’ व्हिडीओ