Video: मस्ती पडली महागात! माकडांनी तरुणांना बेदम लाथा मारत पळवून लावलं

0
14

व्हायरल व्हिडिओतून माणुसकीचे दर्शन घडते तर कधी क्षुल्लक कारणांवरुन हाणामारीही होताना आपण पाहिली आहे. परंतु सध्या सोशल मीडिया एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, व्हिडिओत माकडांचा तरुणावर हल्ला होताना दिसत आहे
एका मोकळ्या मैदानात काही तरुण आहेत तर अजून काही माकड दिसत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की वैतागलेल्या माकडांनी तरुणांवर हल्ला केलाय. माकडांपासून वाचण्यासाठी तरुण पळण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओत एक पाढंऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुण पळण्याचा प्रयत्न करत आहे परंतू तेवढ्यात एक माकड त्याच्यावर पाठीवर उडी मारतो. काही वेळानंतर माकडांची टोळी तिथून निघून जाते.